खर तर घोरणं म्हणजे घरो घरी एक सामान्य आणि एक हास्या चा विषय अस्तो. शेजारी झोपलेल्या माणसासाठी रागाचा आणि इतरांचा कुतूहलाचा विषय! हल्ली घोरणे ह्या विषयावर बरच सौशोधन होत आहे.

झोपेत आपला श्वासोस्वास सुरळीत हॊत असला तर कुठलाही आवाज येत नाही. घोरणे म्हणजे स्वसोस्वसाला बाधा. नाकापासून ते फुफुसा पर्र्यंत कुठेही हा अडथळ।  असू शकतो. झोपेत घोरणारा माणूस प्रत्येक क्षणाला स्वस साठी झगडत अस्तो. ह्याचा परिणाम म्हणजे रात्रीची झोप नीट न होणे. सकाळी फ्रेश न उठणारा माणूस दिवसभर ह्याच effect खाली रहतो. बरेच दिवस असेच गेले कि त्याचा परिणाम आपल्या सगळ्याच स्वास्थ्यावर पडतो.

श्वसनक्रियेत हळू हळू बाकीचे बदल लक्ष्यात येऊ लागतात. जोर जोरात घोरणे आणि मधेच स्वस थांबणे . ह्या परीस्तीतीला apnoea असे म्हन्णतात . श्वास  थांबला कि रक्तातला oxygen कमी होतो. ज्या वेळेस तो कमी होतो आणि Carbon diaoxide वाढतो तेव्हा मेंदू कडून emergency switchहोते  आणि जोरात श्वासोश्वास चालू होतो आणि त्याच्या बरोबर घोरणं !

घोरण्याची करणे बरीच पण सगळ्यात महत्वच म्हणजे वाढते वय ज्याच्या मुले धील्ले पडणारे स्नायू आणि वाढणारे वजन !ह्या खेरीच आत असणारी उन्वटी , मोठ्या आकाराची पधजीभ व इतर बर्याच गोष्टी . मद्यपान हे सुद्धा एक मोठे कारण आहे .

ह्या व्याधीचे आता एक योग्य परीक्षा किव्वा परीक्षण करता येते. एक छोटेसे यंत्र आपल्या छातीला बांधले जाते आणि ते आपले झोपेतली परिस्तिति प्रत्येक क्षणी record करते . आपल्या रक्तातला oxygen . हृदयाचे ठोके , झोपेण्याची position इत्यादी . ह्याला sleep study म्हणतात . रुग्णाच्या व्याधी नुसार वेगळ्या sleep studies असतात . ९० % रुग्णांना basic चाचणी पुरते . ह्या चाचणी तुन आपल्याला हे लक्ष्यात येते की हा आजार कितपत गंभीर आहे . एकदा हे लक्ष्यात आले म्हणजे ज्या व्यक्तींना जास्त त्रास आहे त्यांना पुढच्या तपासण्या करून घ्याव्या लागतात .

ह्यापुध्ची तपासणी म्हणजे sleep  endoscopy . ह्या तपासणी मधे रुग्णाला एक झोपेचे औषद देऊन त्याच्या नाकातून एक छोटीशी दुर्बीण घालून , नक्की कुठे आडथाळा येतो आहे ते बघता येते . अचूक जागा मिळाली तर त्याची शस्त्रक्रिया करता येते .

काही रूग्णांना ज्यास्त complicated तपासण्या कराव्या लागतात . असे रुग्ण सुदय्वने बरेच कमी असतात .

घोरणे थांबवण्य साठी प्रत्येक व्यक्तिने आपलं आरोग्य सांभाळण्याची गरज आहे . ह्याच्या मुळे बर्याच व्याधींपासून आपण दूर राहू शकतो . नियमित व्यायाम संतुलित आहार आणि मद्यपान टाळणे . झोपेची वेळ रोज तीच ठेवणे आणि सुमारे ८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करणे .

पण तरीही जो पर्यान्त्त  आपण हे ideal  (आणि कठीण ) ध्यॆय आपण साध्या करत नाही तो पर्यंत आपण ह्या व्याधीची दखल  घेणे गरजेचे आहे . खूप घोरणारि व्यक्ती सकाळी निरुत्साही असते आणि अश्या परीस्तीतीत व्यायाम आणि diet ह्या विषयांकडे पाहणे थोडे कठीण होते . त्यामुळे मी माझी प्रकृती सुधारीन आणि त्यानंतर आपोआप घोरणे बंद होईल अश्या अशॆत राहून अधिकच नुकसान होऊ शकते .

ह्या आजाराचा उपचार तरी कसा होईल ?  sleep endoscopy  नंतर नेमकं  कारण आणि जागा सापडली कि प्रमुक्याने  २प्रकारच्या उपचार पद्धती अहॆत . सर्वात प्रथम म्हणजे CPAP . हे एक यंत्र आहे . हे यंत्र रात्रभर आपल्या नाकातून किव्वा तोंडातून एक प्रकारचा हवेचा दाब निर्माण करता आणि आपली श्वासनलिका उघडी ठेवते . बहुतांश लोकं नाकाचा mask वापरू शकतात , काहींना पूर्ण चेहर्याचा mask लागतो . हे machine आपल्याला कृत्रिम श्वास सुद्धा देऊ शकते . परंतु ह्या पद्धतीने झोपणे बर्याच लोकांना पसंत्त पडत नाही .

दुसरा परियाय म्हणजे शस्त्रक्रिया . जर अचूक जागा जिथे अडथळा आहे अशी सापडली आणि त्याची शास्त्रीक्रिया शक्य असली तर खूप चांगले results मिळू शकतात .

कदाचित आश्चर्य वाटेल कि ह्या व्याधीचे बरेच रुग्ण लहान मुला आहेत . वाढलेले तोंसिल्स आणि अदेनोइद च्या ग्रन्थि त्यांची रात्रीची झोप खूप अस्वस्त करते आणि त्यांच्या मध्ये ही ह्या आजाराची सगळीच चिंने  दिसतात . तोंसिल्स आणि अदेनोइद्स न कढण्या बद्दल बरेच गैर समाज समाजात आहेत . टोन्सील अंड अदेनोइद्स काढल्यl मुळे आपल्या स्वास्थ्या वर काहीही परिणाम होत नाही . कदाचित ह्या मुळे होणाऱ्या आजारान पासून सुटका झाल्या मुळे त्या मुलाची तबेयेत चांगलीच होते . ही शस्त्रक्रिया केल्या मुळे हा problem  आपण सहज सोडवू शकतो .

मोठ्या मान्संमाधेय वेगवेगळ्या ठिकाणच्या अडठ्ल्या साठी वेगवेगळी शस्त्रक्रिया अहेत. ह्या बर्याचश्या शास्त्रीक्रिया तोंडाच्या किव्वा नाकातून होतात .

तरीसुद्धा आपलं वजन नियंत्रणात ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे हे ह्या रुग्णांना अनिवार्य आहे .