PCOS म्हणजे नेमके काय?PCOS (Polycystic Ovary Syndrome) ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य हार्मोनल आणि मेटाबॉलिक समस्या आहे. अनेकांना वाटते PCOS म्हणजे ovary मध्ये cysts किंवा फक्त पाळी अनियमित असणे. पण PCOS हा त्यापेक्षा अधिक व्यापक विषय आहे.PCOS मध्ये पाळी आणि ovulation मधील बदल, androgen hormones मध्ये वाढ आणि metabolic health मधील बदल वेगवेगळ्या प्रमाणात दिसू शकतात. प्रत्येक महिलेमध्ये लक्षणे सारखी नसतात.
PCOS मध्ये शरीरात काय बदल होतात?- पाळी उशिरा येणे किंवा अनियमित होणे, काही वेळा अनेक महिने पाळी न येणे- ovulation नियमित न होणे, गर्भधारणेस अडचण- चेहऱ्यावर किंवा शरीरावर जास्त केस येणे- acne, oily skin- डोक्यावरील केस पातळ होणे किंवा गळणेPCOS म्हणजे ovary मध्ये cysts असणे का?नेहमीच नाही. PCOS चे निदान केवळ ultrasound पाहून केले जात नाही. काही महिलांमध्ये polycystic morphology दिसू शकते, तर काहींमध्ये नाही. म्हणून “ultrasound normal म्हणजे PCOS नाही” किंवा “follicles आहेत म्हणजे PCOS आहे” असे सरळ निष्कर्ष चुकीचे आहेत.निदान करताना डॉक्टर पाळीचा इतिहास, लक्षणे, शारीरिक तपासणी, blood tests आणि ultrasound यांचा एकत्रित विचार करतात.PCOS आणि वजनाचा संबंधप्रत्येक PCOS असलेल्या महिलेचे वजन जास्त असेलच असे नाही. सडपातळ महिलेलाही PCOS होऊ शकतो. वजन जास्त असल्यास वजन व्यवस्थापनाने metabolic health आणि काही लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते, मात्र उपचार व्यक्तिनुसार ठरतात.PCOS आणि Insulin Resistanceकाही महिलांमध्ये insulin resistance आढळते, म्हणजे पेशी insulin ला योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे शरीर जास्त insulin तयार करते. वाढलेले insulin आणि androgen hormones यांचा संबंध ovulation वर परिणाम करू शकतो. म्हणून PCOS कडे फक्त gynecological नव्हे तर metabolic दृष्टीनेही पाहणे गरजेचे आहे.PCOS आणि DiabetesInsulin resistance मुळे काही महिलांमध्ये Type 2 Diabetes आणि इतर metabolic problems चा धोका वाढू शकतो. म्हणून गरजेनुसार blood glucose तपासणी सल्ला दिला जातो.
PCOS म्हणजे आयुष्यभर त्रास का?नाही. PCOS ही दीर्घकालीन प्रवृत्ती असली तरी योग्य lifestyle, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचारांनी त्याचे व्यवस्थापन करता येते.उपचाराचा उद्देश फक्त ultrasound बदलणे नाही, तर पाळी नियमित करणे, androgen लक्षणे नियंत्रित करणे, metabolic health सुधारणे आणि दीर्घकालीन धोके कमी करणे हा असतो.Lifestyle ची भूमिकापुरेसे protein, भाज्या, फळे, whole grains आणि healthy fats असलेला संतुलित आहार उपयुक्त आहे. PCOS आहे म्हणून अत्यंत कडक diet करण्याची गरज नसते. फक्त वजन कमी करण्यावर लक्ष देणेही योग्य नाही.डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?पाळी वारंवार अनियमित असणे, चेहऱ्यावर जास्त केस, सततचे acne, केस गळणे, गर्भधारणेत अडचण, वजनात अनपेक्षित बदल असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधे किंवा supplements सुरू करू नका.