पोट साफ होण्यासाठी महत्वाच्या सूचना 

विहार 

  • दररोज कमीत कमी ४ किलोमीटर पायीचालावे 

  • दुपारी झोपू नये 
  • रात्रीचे जेवण सायंकाळी ७ च्या आतकरावे 
  • जेवणानंतर शतपावली करावी 
  • जेवण आणि झोप यांत कमीतकमी३ तासांचे अंतर असावे 
  • दररोज ४ लीटर पाणी २४ तासांत मोजून  प्यावे 
  • दिवसभरात कमीत कमी२ ग्लास कोमटपाणी प्यावे 

आहार 

  • आठवड्यातून एकदा तरी रात्री झोपतांना कोठ्यानुसार  एरंडेलतेल घ्यावे 
  • दररोज रात्री झोपतांना१ ग्लास दुधात ३ - ४ चमचे गाईचे शुद्धतूप टाकून प्यावे
  • दररोज रात्री १ग्लास पाण्यात  मुठभर मनुके भिजवून ठेवावे व सकाळी अनशेपोटी चावून खावे 
  • रात्रीच्या जेवणानंतर न चुकता ग्लास भर पाण्यात इसबगोल चूर्ण घ्यावे 
  • High Fibre Diet म्हणजेच अधिक तंतुमय पदार्थ असलेले अन्न खावे जसे संत्रे, मोसंबी (ज्यूस करण्यापेक्षा चावून चोथ्यासकट) खावे. 
  • शक्य तेव्हाफळे साली सकट खावीत .दररोज एक असे फळ खावे 
  • आंबवलेले पदार्थ जसे ब्रेड, इडली , डोसा इत्यादी टाळावेत 
  • दररोज २ गाजर, २ काकडी , १tomato व अर्धे बीट खावे(Salads चे प्रमाण वाढवावे)
  • मांसाहारा नंतर पाण्याचे प्रमाण वाढवावे 
  • सब्जा किंवा इसबगोल असलेले सरबत प्यावे 
  • जेवतांना थोडी भूक राहू द्यावी