उपवासानंतर योग्य आहार म्हणजे शरीरावर अचानक ताण न देता पुन्हा संतुलित आहाराकडे जाणे.उपवासाचे काही दिवस झाल्यानंतर उपवास सोडताना अनेकदा खूप भूक लागलेली असते. त्यामुळे एकदम भरपूर, तळलेले, गोड किंवा जड पदार्थ खाण्याची शक्यता असते. मात्र यामुळे अपचन, आम्लपित्त, पोट फुगणे, मळमळ आणि रक्तातील साखरेत अचानक वाढ होऊ शकते.म्हणून उपवास सोडताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

१. सुरुवात हळूहळू कराउपवास सोडल्यानंतर प्रथम पाणी, कोमट पाणी किंवा हलका द्रव पदार्थ घ्या. लगेच मोठे जेवण करू नका.

२. कमी प्रमाणात खापहिल्यांदा लहान portion घ्या. भूक आणि शरीराची प्रतिक्रिया पाहून हळूहळू प्रमाण वाढवा.

३. प्रथिनांचा समावेश कराउपवासानंतरच्या आहारात दही, दूध, पनीर, डाळी, कडधान्ये किंवा इतर योग्य protein sources यांचा समावेश करा. यामुळे पोट भरल्यासारखे वाटण्यास आणि स्नायूंचे आरोग्य टिकवण्यास मदत होते.

४. तळलेले पदार्थ टाळासाबुदाणा वडा, भजी, चिप्स, पुरी, जास्त तुपाचे किंवा तेलकट पदार्थ उपवास सोडताना मोठ्या प्रमाणात घेणे टाळा

५. गोड पदार्थांपासून सावध रहाउपवासानंतर मिठाई, श्रीखंड, लाडू, बासुंदी किंवा साखरयुक्त पेये जास्त प्रमाणात घेऊ नका. विशेषतः मधुमेह असणाऱ्यांनी रक्तातील साखरेची काळजी घ्यावी.

६. फळे योग्य प्रमाणात घ्याफळे आरोग्यासाठी चांगली असली तरी एकदम मोठ्या प्रमाणात फळे किंवा फळांचा रस घेऊ नका. पूर्ण फळाला फळांच्या रसापेक्षा प्राधान्य द्या.

७. पाणी पुरेसे प्याउपवासामुळे शरीरात पाण्याची कमतरता झाली असल्यास हळूहळू पुरेसे पाणी घ्या. खूप गोड किंवा साखरयुक्त पेयांऐवजी साधे पाणी अधिक चांगले.

८. एकदम भरपूर खाणे टाळा“उपवास केला आहे म्हणून आता भरपूर खाऊ” ही सवय टाळा. उपवासानंतरही portion control महत्त्वाचे आहे.

९. नेहमीचा संतुलित आहार पुन्हा सुरू कराउपवास संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर भाज्या + protein + योग्य प्रमाणातील carbohydrates + healthy fats असलेला संतुलित आहार सुरू करा.

१०. मधुमेह असल्यास विशेष काळजीमधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी उपवास आणि उपवास सोडताना औषधे/इन्सुलिन स्वतःहून बदलू नयेत. रक्तातील साखरेचे नियमित निरीक्षण करावे आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लक्षात ठेवा…उपवास सोडणे म्हणजे भरपूर खाण्याची संधी नाही; शरीराला हळूहळू संतुलित आहाराकडे नेण्याची वेळ आहे.थोडे खा • हळूहळू खा • संतुलित खा • पुरेसे पाणी प्याआरोग्यदायी उपवासाची खरी सांगता — संतुलित आहाराची सुरुवात!

FOR personalized Diet plan, book your appontment for online consultation.Dt.Mousami Pune.