दातांसाठी हानिकारक आहार

      ज्या अन्नामध्ये खूप कमी पोषणमूल्ये असतात, आणि ज्यात चरबी, साखर व मीठ यांचे प्रमाण अधिक असते, म्हणजे प्रोटीन्स, जीवनसत्त्वे, खनिजपदार्थ खूप कमी प्रमाणात आणि कॅलरीज खूप अधिक प्रमाणात असतात, अशा अन्नाला जंक फूड म्हटले जाते. 

      जंक फूड मध्ये अतिशुद्ध, प्रक्रियायुक्त पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे दात किडण्याला चांगलीच संधी मिळते. शिवाय चरबी, साखर आणि मिठाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे संपूर्ण आरोग्यांवरही जंक फूडचा विपरीत परिणाम होऊ शकतो.समावेश पॅकबंद वेफर्स-चिप्स, अति तळलेले, नमकीन, चटपटीत फ्रेंच फ्राइज, मैदायुक्त बेकरी प्रॉडक्ट्स-केक, पेस्ट्रीज, पिझ्झा सारखे चिकट-चिवट पदार्थ, कँडी, सॉफ्टी सारखी डेझट्र्स आणि भरपूर साखरयुक्त शीतपेये इत्यादी पदार्थाचा जंक फूडमध्ये  होतो. हे पदार्थ इतके खमंग, खुसखुशीत व स्वादिष्ट असतात, की ते केव्हा व्यक्तीच्या संपूर्ण आहाराचाच कब्जा घेतात आणि आपण केव्हा या पदार्थाच्या आहारी गेलो हे कळत नाही. हळूहळू जंक फूड – फास्ट फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्स् यांचे आहारातील प्रमाण आणि खाण्याचे प्रसंग वाढत जातात आणि शरीराला आवश्यक चौरस आहार मिळेनासा होतो. 

     मात्र जंक फूड मधील पदार्थाचा आपल्या चौरस आहारात रुचिपालट म्हणून चतुराईने आणि थोडय़ाच प्रमाणात समावेश केल्यास त्याचे फारसे दुष्परिणाम होणार नाहीत. जंक फूड मधील अतिशुद्ध, प्रक्रियायुक्त पिष्टमय पदार्थ जे खूप मऊ, चिकट आणि पिठूळ स्वरूपाचे असतात, ते दाढांच्या खडबडीत पृष्ठभागांवर किंवा दोन दाढांमध्ये चिकटून बसतात. वेळीच हे अन्नकण ब्रशने घासून वा चुळा भरून काढले गेले नाहीत, तर दात-दाढा किडण्याला आयतेच आमंत्रण मिळते. पाश्चात्य पद्धतीच्या अशा अन्नामुळे दात खराब होतात.


                  दातांसाठी उत्तम आहार 


    स्ट्रॉबेरी

दात स्वच्छ आणि मजबूत राहावेत यासाठी स्ट्रॉबेरी हे एक अत्यंत उपुयक्त फळ आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असे अनेक गुणधर्म आणि वैशिष्टये आहेत, जे दात स्वच्छकरून त्यांना ब्लीच करण्यास मदत करतात. चहा आणि कॉफीमुळे दातांवर पडलेले डाग स्ट्रॉबेरीमुळे स्वच्छ होतात. 
 
जेवणानंतर नियमितपणे थोडीफार स्ट्रॉबेरी खायला हवी. स्ट्रॉबेरीमधील आम्ल दातांना नैसर्गिकरीत्या उजळपणा आणते.

      हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे शरीरास रास बेटा केरोटिन मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे मिळालेले `अ` जीवनसत्व आपल्या शरीराला आणि दातांना बळकटी आणते. ताज्या हिरव्या द्विदल कडधान्यांचे दातांवर घर्षण होऊन दात स्वच्छ होतात. तसेच तोंडात लाळ तयार होते. त्यामुळे आरोग्यदायी सुखी आणि आनंदी जीवन जगू शकता.

        कलिंगड
 
कलिंगडाचे दोन काप दररोज खाल्ल्याने शरीरास जितकी `क` जीवनसत्वाची गरज असते, त्यातील २५ टक्के आणि जीवनसत्व यातून मिळते. हे जीवनसत्व दात आणि हिरड्या यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लोह अधिक प्रमाणात शोषूण घेण्याची क्षमता त्याचबरोबर शरीरातील घातक रसायनांचाही ते सामना करू शकते. 

         संत्री
 
संत्रीही नियमितपणे आहारात घेतली पाहिजेत. संत्र हे `क` जीवनसत्वाचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहते. लोह अधिक प्रमाणात शोषले जाते. तसेच `क` जीवनसत्त्वाचे पदार्थ चघळल्यामुळे दातांचा नाश किंवा र्‍हास रोखला जाऊ शकतो.

       सफरचंद
 
दररोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरांना स्वत:पासून दूर ठेवणं शक्य होऊ शकते. सफरचंदामुळे दातांचे आयुष्यमान वाढते. सफरचंदाचा रस पिण्यापेक्षा ते चावून खाल्ल्यास दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते. सफरचंद खाल्ल्यामुळे दात स्वच्छ आणि बळकट होतात.

       द्राक्षा
 
द्राक्षांमध्ये असलेले मॅलिक अॅसिड उत्प्रेरकांसारखे कार्य करते. त्यामुळे दात पांढरे शुभ्र होतात. दातांवरील डाग कमी होतात. जेवणानंतर पाणी प्यायल्यामुळे किंवा चूळ भरल्यामुळे दातांत अडकलेले कण निघून जाण्यास मदत होते.

       कोबी 
 
कोबी खाताना त्याचे दातांना घर्षण होते. त्यामुळे दात उजळण्यास मदत होते. कोबी हा नैसर्गिक टूथब्रश आहे. कोबी खाताना तोंडात लाळ तयार होते. ती दातांवर जमलेले सूक्ष्मकणही दूर करते.