पोटाचे आजार व आयुर्वेद
मनुष्य प्राण्यामध्ये जसे पाठीच्या मणक्याला महत्त्व आहे तसेच जठराग्नीला महत्त्व दिले आहे.
आपल्या शरीरात १३ प्रकाराचे अग्निआहेत यापैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जाठराग्नि. या जाठराग्निवर इतरसर्व अग्नीचे कार्य अवलंबून असते.
प्राकृत अग्नि ही सर्व रोगांनादूर ठेवते, तसेच अग्नि मंद झाल्यावर सर्व रोगांना आमंत्रण मिळते.
आपल्या खाण्या पिण्याचा पद्धतीचा खूप परिणाम अग्नीवर येत असतो. चुकीच्या खाण्या पिण्याच्या पद्धती, preservative food,canned food, wafers यांमध्ये पौष्टिक तत्वे नसते त्यामुळे आपल्या Immunity वर त्याचा परिणाम येतो.
काही चुकीचा जेवणाच्या पद्धती जसे टेबलं खुर्ची वर बसून जेवणे, भटकत,येताजाता, हातात ताट घेऊन जेवणे या सगळयांचा अग्नीवर विकृत परिणाम येतो.
जेवणाची सगळ्यात सुन्दर पद्धत म्हणजे जमिनीवर मांडी घालून बसणे.
अन्नासोबतच पाण्याचाही परिणाम अग्नीवर येत असतो. आपल्या पोटाचे ४ भाग केलेतर त्यातले २ भाग अन्न,१ भाग पाणी व१ भाग वायूचा चालनवलनासाठी राखला पाहिजे. जेवण करताना मधेमधे घोटघोट पाणी सेवन करावे ज्यामुळे chuming चा वेळेस ओलावा मिळतो.
आहार हा षडरसात्मक असावा. एकच रसाचे नित्यसेवन झाले तर ते रोगाला आमंत्रण दिले जाते.
अवेळी जेवणं, भूक नसतानाही जेवणं,अतितिखट, मसालेदार अशा प्रकारचा आहारामुळे अम्लपित्त, छातित जळजळ असे लक्षणे उद्भवतात.
छातीत जळजळ, Acidity होत असल्यास तत्पुरते उपाय केले जातात पणजसे दही असलेल्या भांड्यात कितीही दूध घातले तरी त्याचे दहीच होते. त्यामुळे अम्लपित्ताचा त्रास असल्यास त्याचा औषध व पंचकर्मासोबत समूळ नाश करावा.
भयंकर डोकं दुखत असल्यास विशिष्टऔषधांचे (सूतशेखर रस) प्रधमन नस्याचाखूप चांगला परिणाम दिसून येतो.
त्याचसोबतअम्लपित्तामध्ये वमन कर्मानंतर औषधेवापरल्यास चांगला परिणाम येतो.
पोटाच्यातक्रारीमध्ये महत्वाची तक्रार म्हणजे आव पडणं किंवा प्रवाहिका यामध्ये इंद्रयव/ कुड्याचे पान उगाळून पोटात घेतल्यास व पंचकर्मातील पिच्छाबस्ती त्याचा फायदा होतो. आव पडण्याचे कारण म्हणजे नित्य Bread, बाहेरचे खाणे हे आहे.
IrritableBowel syndrome मध्ये पोटात दुखणं, नुसते मनात विचार आले तरी motion ला होणं या तक्रारीमध्ये पंचकर्मातील शिरोधारा, रोजचा जेवणात धने पावडर सेवन करावी.
पोटदुखीही वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. त्यातीलमहत्वाचे कारण म्हणजे kidney stone, Appendicitis, Kidney stone, Acuteabdomen pain मध्ये दुखणाऱ्या भागावर जलौकावचरण करणे, Appendicitis मध्ये 6-7 जलौका लावणे यामुळे inflammation कमी येते व आराम मिळतो.
अशाप्रकारे अग्नि प्रज्वलित असला तर मनुष्याला निरोगी,समृद्ध जीवन जगता येते.