Take online consultation directly providing all the details through private chat.
Apply luke warm til oil by adding little salt in it on chest and back side after that give him hot water bag swedan
Give him easily digestible food in diet.
Avoid curd buttermilk milk maida products bakery products fermented food paav mataki sprouts rajma पावटे beans in diet.
Avoid biscuits with tea.
Give him 1 small piece of adrak along with 1 chutki saindha salt before eating of food twice in a day before few of food.
For ayurvediy medicine and home remedies diet and lifestyle correction consult online directly.
Next Steps
take online consultation directly providing all details
Health Tips
http://aayurvedatunaarogyakade.blogspot.com/2017/06/blog-post.html?m=0
प्राण वायू ला बिघडवणारी कारणे 👇🏻
१)रुक्ष कोरडा स्नेह रहित आहार घेणे.
२)व्यायाम अतिप्रमाणात करणे.
व्यायाम अर्धशक्ती प्रमाणात करावा त्यापेक्षा अधिक प्रमाणात करू नये.
ह्रदयस्थो यदा वायुर्वक्त्रं शीघ्रं प्रपद्यते|
मुखं च शोषं लभते तब्दलार्धस्य लक्षणम्||
किंवा ललाटे नासायां गात्रसंधिषु कक्षयोः|
यदा संजायते स्वेदो बलार्धं तु तदा$$दिशेत्||
बलार्ध लक्षण--- व्यायाम केल्यानंतर जेंव्हा ह्रदयातील वायु मुखात येत असेल आणि तोंड कोरडे पडत असेल तेंव्हा बलार्ध (शक्तीच्या अर्धा व्यायाम झाला समजावे.
किंवा व्यायाम केल्यानंतर जेंव्हा कपाळ, नाक, सांध्याचे ठिकाणी तसेच काखेत घाम येत असेल तेंव्हा आपल्या ताकदिच्या अर्धा व्यायाम झाला असे समजावे.
३) अति लंघन उपवास करू नये
४) अति प्रमाणात आहार घेणे भुकेपेक्षा अधिक पचनासाठी जड आहार घेणे.
५) मल मूत्र यांचा अवरोध किंवा बल पूर्वक मल मूत्र वेगांना प्रवृत्त करणे.
आदी कारणांनी इंद्रियांना पिडा होते सोबतच सर्दी पडसे खोकला दमा सारखे पुष्कळ आजार शरीरात निर्माण होतात.
१) धुळ व धुरयुक्त वायु श्वासपथात जाणे (बिडी सिगारेट etc चा धुर)
२) थंड स्थानात राहणे, थंड पाणी पिण्याकरिता वापरणे, थंड पाण्याने स्नान करणे.
३)अतिव्यायाम, अतिमैथुन, अत्याधिक चालणे.
४)कोरडे स्नेहरहित पदार्थ खाणे, अवेळी किंवा थोडे किंवा अतिप्रमाणात खाणे.
५)नेहमी अपचनाने आमदोष निर्मिती होत असेल तर, वायु कुपित होऊन उदरात स्थिर होत असेल तर
६) शरीरात रूक्षता अत्याधिक असेल तर, शरीराचे उपवास आदी विविध कारणांनी अपतर्पण झाले असेल तर
७) अत्याधिक दुर्बलता असेल तर, मर्मस्थानावर आघात झाला असेल तर
८) इतर आजारांचा उपद्रव किंवा चिकित्सा उपक्रमाच्या अतियोगने दमा व उचकी आदी रोग उत्पन्न होतात.
९) तसेच सेम, उडद दाळ, तीळाची खल्ली तीळाचे तैलाचे सेवन करणे.
१०) मैद्यासारखे अतिशय बारीक दळलेल्या पिठाच्या पदार्थांचे सेवन करणे, शरीरात विष्टंभ करणारे, विदाहकारक, पचावयास अतिशय जड पदार्थांचे नियमित सेवन करणे.
११) जलज मांस, आनुप प्रदेशातील मांस, दही आणि कच्च्या दुधाचे अधिक सेवन करणे.
कफवर्धक तसेच शरीरातील स्रोतसात अवरोध निर्माण करणारया कारणांनी दमा आणि उचकी सारख्या आजारांची निर्मिती होते.
आजार निर्मितीच्या कारणांचा अतिरेक टाळला तर लहान बालकांत आणि वृध्दावस्थेतील त्रास टाळता येऊ शकतो. क्वचित त्रास झालाच चिकित्सा करून उपद्रव निर्माण न होता दुरूस्त करता येऊ शकतो. पण आजाराची कारणे त्रास सुरू असताना घडत राहीली तर मग उपद्रवस्वरूपी आजारांचा सामना करावा लागु शकतो.
आजार निर्मितीसाठीच्या कारणांनुसार उपाय चिकित्सा बदलते. त्यामुळे वैद्याच्या सल्ल्यानेच चिकित्सा उपक्रम करावा.
कारण कर्शन किंवा अपतर्पणाचे प्रयोग केल्याने उत्पन्न उपद्रव नंतर दुरूस्त होत नाहीत.