“मानसिकआजाराच्या औषधामुळे मेंदू बधिर होतो तो व्यवस्थित काम करत नाही का? कारण आमच्या गावातील एक मुलगा ज्याला मानसिकआजार झाला होता तो फक्त बसून असतो, काहीही करत नाही, त्याला जास्त काही समजत नाही.” रमेश ने विचारले.बऱ्याच वेळी  नवीन पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक मलाअसे  प्रश्न विचारतात.  याबद्दल त्यांना किंबहुना पूर्ण माहिती नसते वहे सर्व गैरसमज ऐकीव गोष्टींवर अवलंबून असतात. मी त्यांना समजावायचा प्रयत्न करतम्हणालो, “हा ही एक खूप मोठा गैरसमज आहे. पूर्वी सांगितल्या प्रमाणेआपण 2020 मध्ये जगतोय. खूप चांगली औषधे आज उपलब्ध आहेत. औषधामुळे मेंदू बधिर होतनाही. किंबहुना लगेच औषधोपचार सुरू न केल्यास तो व्यवस्थित पूर्ण न केल्यास व आजारवाढत गेल्यास, स्किझोफ्रेनिया सारख्या आजाराच्या काहीरुग्णांमध्ये आजारामुळे मेंदू बधिर होऊ शकतो किंवा मेंदू व्यवस्थित काम करत नाही.हा गोळ्यांचा साइड इफेक्ट नसतो. उलट औषधे मानसिक आजाराला कंट्रोल करून आजारामुळेमेंदुवर होणारा हा परिणाम थांबवण्यास मदत करतात.” कदाचीत त्यांच्या डोक्यात आताप्रकाश पडायला  लागला होता. तुम्ही ज्यारुग्णाबद्धल बोलत आहात त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व मानसिक तपासणी केल्याशिवाय हे कळणे अवघड आहे. एकतर त्याचा उपचार व्यवस्थित झालानसावा, किंवा तो पाहिल्यापसून मतिमंद किंवा गतीमंद असावाकिंवा मग त्याला आजारासोबत गांज्याचे व्यसन असावे किंवा मग नेगेटिव सीजोफ्रेनियाचाप्रकार असावा.” मी समजाऊन सांगायचा प्रयत्न केला. शेवटची गोष्ट त्यांच्यासाठीबाऊन्सर असला तरीही पहिल्या गोष्टी त्यांना नक्कीच समजल्या असणार याची खात्रीहोती. “मानसिक आजाराच्या औषधाने किडनी खराब होते,मानसिक आजाराच्या गोळ्यांनी लैंगिक समस्या होतात हे त्यातलेच काही गैरसमज” मीत्यांना पुढे समजावत सांगत म्हणालो. “म्हणजे मानसिक आजाराच्याऔषधाचे काही साइड इफेक्ट नाहीत आणि ते पूर्ण सेफ आहेत असे आहे का?” रमेश च्याभावाने आता माझ्यासाठी बाऊन्सर टाकला. पण मी तयार होतो. हा बाऊन्सरमाझ्यासाठी नवीन नव्हता. “नाही, नक्कीच असे नाही. प्रत्येक औषधाचे काही साइड इफेक्ट असतात. तसेच याचेहीअसतात. परंतु ते सगळ्यांनाच होतील असे नाही.  व्यक्तीच्या शरीरानुसार त्याचे प्रमाण व स्वरूपबदलू शकते. औषधाचा फायदा जास्त होतोय की तोटा जास्त होतोय हे डॉक्टरांच्यासल्ल्यानुसार ठरवून योग्य निर्णय घ्यायला हवा.”“मी तुम्हाला बाकी साइडइफेक्ट बद्दल न सांगितलेलेच बरे कारण तुम्हाला ते माहीत झाले  तर तुम्ही त्या प्रत्येक गोष्टी बद्धल जास्तच विचार कराल. आणि सगळ्याच गोळ्यांच्या सगळेच साइड इफेक्ट सांगायचे म्हटले तर दिवसपुरणार नाही. परंतु तुम्हाला जेंव्हा केंव्हा काही साइड इफेक्ट जाणवेल, किंवा काही त्रास जाणवेल किंवा स्वत मध्ये काही बदल जाणवेल तेंव्हा नक्कीसांगा. जर तो तुम्हाला दिलेल्या गोळ्यांचा साइड इफेक्टअसेल तर आपण त्यात गरजेप्रमाणे डोस कमी करुयात, किंवा बदलकरुयात किंवा मग त्यासाठी इतर काय पर्याय शोधत येईल हे बघूयात.” मी त्यांनासांगितले.    क्रमशः