Related Questions
सकाळी उठल्या उठल्यावर ब्रश करण्याच्या अग
सकाळी उठल्या &... Read more
Fungle infection problem
गेल्या 7 ते 8 मह... Read more
Indigestion causing gas & mild constiptn
नमस्ते, मुझे ड... Read more
दातांसाठी हानिकारक आहार
ज्या अन्नामध्ये खूप कमी पोषणमूल्ये असतात, आणि ज्यात चरबी, साखर व मीठ यांचे प्रमाण अधिक असते, म्हणजे प्रोटीन्स, जीवनसत्त्वे, खनिजपदार्थ खूप कमी प्रमाणात आणि कॅलरीज खूप अधिक प्रमाणात असतात, अशा अन्नाला जंक फूड म्हटले जाते.
जंक फूड मध्ये अतिशुद्ध, प्रक्रियायुक्त पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे दात किडण्याला चांगलीच संधी मिळते. शिवाय चरबी, साखर आणि मिठाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे संपूर्ण आरोग्यांवरही जंक फूडचा विपरीत परिणाम होऊ शकतो.समावेश पॅकबंद वेफर्स-चिप्स, अति तळलेले, नमकीन, चटपटीत फ्रेंच फ्राइज, मैदायुक्त बेकरी प्रॉडक्ट्स-केक, पेस्ट्रीज, पिझ्झा सारखे चिकट-चिवट पदार्थ, कँडी, सॉफ्टी सारखी डेझट्र्स आणि भरपूर साखरयुक्त शीतपेये इत्यादी पदार्थाचा जंक फूडमध्ये होतो. हे पदार्थ इतके खमंग, खुसखुशीत व स्वादिष्ट असतात, की ते केव्हा व्यक्तीच्या संपूर्ण आहाराचाच कब्जा घेतात आणि आपण केव्हा या पदार्थाच्या आहारी गेलो हे कळत नाही. हळूहळू जंक फूड – फास्ट फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्स् यांचे आहारातील प्रमाण आणि खाण्याचे प्रसंग वाढत जातात आणि शरीराला आवश्यक चौरस आहार मिळेनासा होतो.
मात्र जंक फूड मधील पदार्थाचा आपल्या चौरस आहारात रुचिपालट म्हणून चतुराईने आणि थोडय़ाच प्रमाणात समावेश केल्यास त्याचे फारसे दुष्परिणाम होणार नाहीत. जंक फूड मधील अतिशुद्ध, प्रक्रियायुक्त पिष्टमय पदार्थ जे खूप मऊ, चिकट आणि पिठूळ स्वरूपाचे असतात, ते दाढांच्या खडबडीत पृष्ठभागांवर किंवा दोन दाढांमध्ये चिकटून बसतात. वेळीच हे अन्नकण ब्रशने घासून वा चुळा भरून काढले गेले नाहीत, तर दात-दाढा किडण्याला आयतेच आमंत्रण मिळते. पाश्चात्य पद्धतीच्या अशा अन्नामुळे दात खराब होतात.
दातांसाठी उत्तम आहार
स्ट्रॉबेरी
Book an appointment with the top
Dentist near you.
सकाळी उठल्या &... Read more
गेल्या 7 ते 8 मह... Read more
नमस्ते, मुझे ड... Read more