Related Questions
Fibrooedenomas
Non surgical treatment होम्योपै&... Read more
लिंग पर सफेद दाने व आगे की चमड़ी का फटना
सर पिछले कुछ द... Read more
Not Feel good
स्खलन रोका तो ... Read more
पाठीचे विकार व आयुर्वेद
मनुष्य, प्राणी व इतर प्राणी यातील मूळ फरक म्हणजे पाठीचा मणका. इतर प्राण्याची पाठ ही जमीनीला समांतर असते , पण माणसाची पाठ ही उभी असते त्यामुळे weight bearing चा परिणाम मनुष्याचा पाठीवर जास्त प्रमाणात येत असतो .
पाठीच्या मणक्याचे काम हे नुसते शरीरावर निगडीत न राहता मनावर व आत्म्यावर ही होत असते . ताठ बसून meditation , साधना ही उत्तम प्रकारे होत असते. जसे निरोगी पाठीमुळे आपले मन व आत्मा निरोगी असतो तसेच जर पाठीचा तक्रारी उत्पन्न झाल्या तर मनाचा तक्रारीही उत्पन्न होतात.
पाठीच्या दुखण्याचा निगडीत शरीरातले इतर जुनाट व्याधीही असतात जसे piles (अर्श ) , जुनाट सर्दी , खोकला, स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः बघितले तर slip disc , fibroids याचाही परिणाम पाठीवर येत असतो.
बाळंतपणानंतर शेक शेगडी, मालीश, ज्याला सूतिका परिचर्या असे म्हणतात त्याचे पालन जर केले तर पाठीच्या मणक्याचे त्रास हे कमी होतात.
पाठीच्या मणक्याला पौष्टिक असलेले डिंकाची खीर, अहळीवाची खीर , डिंकाचे लाडू याचे नित्य सेवन असावे तसेच रोजच्या आहारात दूध, तूप, याचे सेवन असावे .
पिंपळाचीलाख असलेला लाक्षादी गुग्गुळ , महायोगराज गुग्गुळ रौप्य युक्त अशा औषधांचे सेवनकेल्यास पाठदुखी नष्ट होते.
औषधांसोबतपंचकर्म केल्यास रोगाचा पुन्हा: उद्भव होत नाही. पाठीच्यादुखण्यास विशिष्ट असे तेलांचे स्नेहन, विशिष्ट औषधांचे स्वेदन, बस्ती, कटिबस्ती केली जाते. हाडांच्याबळकटीसाठी काही विशिष्ट क्षीरबस्ती केली जातात. त्याच बरोबर क्षीरबस्ती केलीजातात. त्याच बरोबर हाडांची झीज थांबवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पिंडस्वेदकेले जाते, त्यात औषधांची पोटली बनवून शेक दिला जातो.
Cervical Spondylosis मध्ये पाठ दुखी असणाऱ्या लक्षणांमध्ये भयंकर चक्कर येणे यांत सूत + अनंताचूर्णाचे प्रधमन नस्याने त्वरीत आराम मिळतो / खूप फायदा होतो.
वृद्धावस्थेतहोणाऱ्या पाठ दुखी रोखण्यासाठी लहानपणी पासूनच पाठीची नित्य काळजी घेणे जरुरीची आहे.लहानपणी पौष्टिक खाणेपिणे, पौष्टिक लाडू, दूध, तूप सेवन करावे. व्यायाम, प्राणायामनित्य करावे, Body postures व्यवथित असणे गरजेचे आहे.
नित्य अभ्यंगकरणे, ऋतूनुसार पंचकर्म, नित्य दिनचर्या, ऋतुचर्या याचे पालन करावे ज्याने आपण म्हणूशकू,
"पाठ दुखी तूला राम राम !"
Book an appointment with the top
Ayurveda near you.
Non surgical treatment होम्योपै&... Read more
सर पिछले कुछ द... Read more
स्खलन रोका तो ... Read more