आजकालच्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे माणसाचे जीवन, खाणे-पिणे, झोप या सर्व गोष्टीही बदल्या आहेत. यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावरही दिसून येतो.Hypertensionहा व्याधी आधी वयाच्या 60-70  च्या दरम्यान आढळायचा परंतु त्याचा Incidenceआता वाढलेला दिसतो, आजच्या युगात हा व्याधी वयाच्या 20 ते 40 पर्यंत येऊन ठेपला आहे. तसेच 40-45टाक्यांपर्यंत त्याची वाढ झालेली आहे.काही वेळेस BP हा Naturally कमी / वाढलेला दिसून येतो जसे खूप थकल्यानंतर, संध्याकाळच्या वेळेस, HighAltitudeवर गेल्यावर कमी होतो व जोर जोरात चालणे, पळणे, जिने चढणे अशा वेळेस नैसर्गिक रित्या BPवाढतो.आयुर्वेदानुसार BP हा व्याधी होण्यामागे काही महत्त्वाची करणे आहेत जसे विदग्धाजीर्ण, रक्तपित्त, रसशेषाजीर्ण .त्याचसोबत व्यसने, रात्री जागरण, वजन जास्त असणे ही कारणेही खूप महत्त्वाची आहेत. चक्कर येणे, मळमळ होणे ह्या दोन गोष्टी BP मध्ये बदल झाल्यास दिसून येतात.आयुर्वेदानुसार BPवाढण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे अजीर्ण असणे. कधीकधी BP हा मानसिक ताणामुळे उद्भवतो. जे लोक खूप चिंता करतात, त्यांना हा व्याधी मागे लागतोच.त्याच सोबत बरेचदा एकच गोळी अनेक वर्ष घेतली जाते किंवा वैद्यांना न विचारता गोळी बंद केली जाते.BP कमी झाल्यावर काही लक्षणे दिसतात जसे ओठाला मुंग्या, हाताला मुंग्या येणे, हात थंड पडणे, अंधारी/चक्कर येणे अशावेळेस प्रवाळपंचामृत गोळी लिंबू साखरे सोबत घेणे.BP normal ठेवण्यासाठी पुढील गोष्टी केल्या पाहिजेत-हलके, भाजके अन्न, मुगाचे सूप, तांदळाचे कढण घेणे रात्रीचे जेवण हे 5-7 pm ला घेणे व दुपारचे जेवण हे 10-11am च्या मध्ये घेणे.त्याच सोबत काही औषधांचा खूप छान परिणाम दिसून येतो जसे हृदयार्णवरस, सुवर्णसूत शेखर.जेवणानंतर जीरे/ शहाजीरे खडीसाखरे सोबत घेणे.औषधांसोबत पंचकर्माचाही खूप छान परिणाम दिसून येतो जसे हृदयाच्या ठिकाणी असलेले स्तनरोहित व स्तनमुल ह्या मर्मावर जलौका लावणे, BPखूप वाढला असल्यास 210/170 पर्यत असल्यास घशाच्या ठिकाणी जळू लावल्यामुळे पुढे येणार paralyticattack टळू शकतो.त्याचसोबत लाक्षादी/ चंदनबालालाक्षादी तेलाची हृद्यबस्ती करणे.बऱ्याचदा गर्भिणींमध्ये BP वाढलेला दिसतो त्याचा परिणाम placentaवर आणि त्यामुळे बाळावरही येतो.तसेच गर्भिणी मध्ये पायावर सूज येणे, Eclempsia, Diplopia ही लक्षणे दिसतात. विदारीगंधादीगण + श्वदंष्ट्रादीघृताच्या बस्तीचा खूप उपयोग होतो.खूप वाढलेल्या BPमुळे रक्तपित्ता सारखे व्याधी उद्भवतात ज्यामध्ये योनीमधून रक्तस्राव होतो. अशावेळेस वैद्यांच्या सल्ल्याने औषधांचा उपयोग करावा.BP वाढल्यामुळे होणारी चिडचिड, घाम येणे, यामध्ये प्राणायाम, अनुलोम, विलोम सकाळी करणे, शीतली, सीत्कारी हे करणे.तसेच कमळाचे पान छातीवर ठेवावे. अशा प्रकारे बदलत्या जीवनशैलीच्या परिणामामुळे होणारा BPआपण टाळू शकतो.