वंध्यत्व Infertility                                                                                                                                                                  आई सारखा तगादा नको लावुस मागे आम्ही family planing केल आहे वर्षे भराने बघू अस प्रत्येक घरात आपण ऐकतो, पण वर्षे निघून जात तरीपण पाळणा काही हालतच नाही ? मग मागे लागत ते अनेक चाचण्या , सोनेग्राफी , अनेक डाॅ सुद्धा सुचवले जातात आणि बदलले सुद्धा पण हाती काही लागत नाही हे अस का याचा कधी विचारच होत नाही आणि दोघेही अपराधी असल्या सारखे एकमेकांशी वागतात आणि वंध्यत्व ही समस्या स्वतःमोठी करतात. यामध्ये दोघानी आपल्या छोट्या मोठ्या शारिरीक व मानसिक बाबीचा विचार केलेलाच नसतो.स्त्री ची शरिर रचना व पुरूष शरिर रचना ही वेगळी असून त्यात काही नैसर्गिक विकृती आहे का? आहारीत काही बदल किंवा काही सवयी, वैचारीक मतभेद, मानसिक ताण, तणाव याचा परिणाम झालेला आहे का हे कोणीच बघत नाही, परिणामी एकमेकांना दोष देतात . आयुर्वेदाने रचनात्क किंवा क्रियात्मक दोष असल्यामुळे मानसिक असंतुलन, शुक्राणु आणि बिजांडामध्ये बिघाड असल्याने, प्रकृतीनुसार आहार व आचरण न ठेवल्यामुळे, इतर कोणत्याही कारणामुळे किंवा रोगामुळे स्त्री व पुरूषांची शक्ती कमी झालेली असल्यास गर्भ धारणा होत नाही . 

●योनी, गर्भाशय मुख(सर्विक्स), गर्भाशय ह्या समुदायाला योनी म्हणतात, ह्यात रचनात्मक दोष असल्यास गर्भधारणा होत नाही. ●योनी लहान असणे, संकुचित असणे 

●गर्भाशय अशक्त असणे, गर्भाशय मुख संकुचित असणे, योनी पटल अविभाजित असणे 

●अंडकोष विकृती (पाॅलिसिस्टिक ओव्हरी) अंडवाहिनी अवरूद्ध (ब्लॉक फॅलोपिअन ट्यूब)

●स्त्रीच्या शरिरात जास्त प्रमाणात पित्त दोष वाढल्यास योनी मध्ये अतिरिक्त उष्णता तयार होते आणि समागमानंतर शुक्राणु (शीत व सौम्य गुणात्मक) लगेच मृत होतात. 

●अम्लपित्त, गोवर, कांजिण्या इ, रोगाचा इतिहास असल्यास त्याचा शरिरावर झालेल्या उष्णतेचा परिणाम 

●क्वचित अज्ञानामुळे स्त्रीला मैथुन कर्माची भिती वाटणे, मैथुन कर्म सहन न होणे त्यामुळे गर्भधारणा होत नाही.

पुरूषा मधील कारणे : 

● पुरूषामध्ये शुक्राणु तयार न होणे 

●शुक्रवाहिनी मध्ये अडथळा असणे 

●शुक्राणु अल्प किंवा विकृत असणे 

●मैथुन अक्षमता , शीघ्रपतन 

●रसरक्तादी धातूचे पोषण नसणे 

●अतिस्थौल्य (जाड), अतिकृश 

● मद्य (दारू) अतिसेवन करणे, धुम्रपान (सिगारेट, तंबाखू) अतिसेवन असणे 

●अतिजागरण करणे, व्यायामाचा अभाव

●अहितकर पदार्थाचे सतत सेवन करणे या प्रकारचा त्रास असल्यास त्यावर लवकरात लवकर योग्य मार्गदर्शन व उपचार करावेत. पुढे आयुष्यभर त्रास सोसण्या पेक्षा वेळीच निर्णय घ्या .